E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
ज्येष्ठ क्रीडा संघटक संजय नाईक यांचे षष्ठ्यब्दीत पदार्पण
Vikrant kulkarni
21 May 2025
विक्रांत कुलकर्णी
पुणे : राष्ट्रीय खो-खोपटू संजय नाईक सर हे सारसबागेत सकाळी ६ वाजल्यापासून पुण्यातील तरुणांपासून ते वयोवृद्धांना व्यायामाचे धडे देतात. ज्येष्ठ क्रीडा संघटक संजय नाईक सर उद्या षष्ठयब्दीत पदार्पण करत आहेत. त्यांना केसरी परिवारातर्फे शुभेच्छा. यामध्ये ते सकाळी ६ ते ७ यावेळेत चालणे आणि पळणे. तसेच ७ ते ७.१५ या वेळेत जोर मारणे. त्याचप्रमाणे ७.१५ ते ७. ३० या वेळेत दीडशे बैठका मारणे. ७. ३० ते ८ या वेळेत सूर्यनमस्कार व इतर व्यायाम प्रकार करून घेणे. त्यानंतर ८ ते ८. ५ मिनिटांमध्ये भीमरुपी म्हणणे. असा उपक्रम मागील २००६ या वर्षांपासून सुरु आहे. हा उपक्रम आठवड्याचे सातही दिवस चालतो. संजय नाईक सर विनामूल्य हा उपक्रम राबवितात. यामध्ये आतापर्यंत ७०० ते ८०० लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. सध्या ५० महिला आणि ७० पुरुष दररोज या उपक्रमात व्यायाम करण्यासाठी येतात. यामध्ये २० वर्षाच्या मुलीपासून ते ७८ वर्षांपर्यंतचे नागरिक व्यायाम करून स्वतः ला तंदुरुस्त ठेवत आहेत. या ठिकाणी अगदी नैसर्गिक पद्धतीने व्यायाम करून घेतला जातो. यामध्ये जोर, बैठका, सूर्यनमस्कार, पळणे, प्राणायाम योगा असे भारतीय परंपंरेला अनुसरून व्यायाम प्रकार घेतले जातात. या उपक्रमामुळे अनेकांना पोटदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, टाचदुखी आणि मायग्रेन, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारापासून मुक्तता मिळाली आहे.
त्याचप्रमाणे या उपक्रमाव्दारे वर्षातून २ ते ३ वेळा गड किल्ले चढणे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक ठिकाणी सहली घेऊन जाणे हे देखील या उपक्रमाद्वारे संजय नाईक सर आपल्या व्यायामपटूंसाठी करतात. तसेच व्यायाम करणार्या गुणवंत पाल्यांचा सत्कार देखील ते करतात. या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
संजय नाईक सर यांनी १९७८ साली शालेय जीवनात असताना क्रीडा क्षेत्रात प्रवेश केला. १९८२ या वर्षात करीमनगर आंध्रप्रदेश येथील महाराष्ट्र कुमार खो-खो संघात निवड झाली. त्यानंतर १९८४ या वर्षी आदिलाबाद आंध्र प्रदेश येथील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली. १९८५ मध्ये पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे निवड झाली तसेच पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत दिल्ली येथे सुवर्ण पदक मिळविले. त्यावेळी शासनातर्फे त्यांना ३००० रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी १९८६ यावर्षी इंदूर मध्यप्रदेश येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेत सुवर्ण कामगिरी केली. त्यानंतर १९८६ ते १९८८ पर्यंत म्हाडातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय कर्मचारी स्पर्धेत जिल्हा पातळीवरील लांब उडी, उंच उडी या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच १९८९ आणि ९० या वर्षी महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाचे व्यवस्थापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. गोवा आणि औरंगाबाद येथे झालेल्या फेडरेशन चषकाच्या सामन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. १९९२ आणि १९९३ या वर्षी महाराष्ट्र संघाच्या समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. १९९६ आणि १९९७ या वर्षी बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुष संघाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने संजय सरांना नुकतेच निर्मिती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Related
Articles
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट
31 May 2025
गुंड गजा मारणेच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत वाढ
04 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट
31 May 2025
गुंड गजा मारणेच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत वाढ
04 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट
31 May 2025
गुंड गजा मारणेच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत वाढ
04 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट
31 May 2025
गुंड गजा मारणेच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत वाढ
04 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी